ABP Majha Marathi News Headlines 2:00 AM TOP Headlines 17 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 2:00 AM TOP Headlines 17 April 2025
धनंजय मुंडेंनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं पुन्हा टाळलं, विमानाचं तांत्रिक कारण देत पिंपळनेरला जाणार नसल्याचं ट्विट, सुरेश धसांसोबत होता एकत्रित कार्यक्रम...
फडणवीसांची चाकरी करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडा, अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचा संजय राऊतांचा दावा..तर खोटं बोलण्याची लिमिट असते, संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर
नाशिकच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली वरिष्ठ नेत्यांची बैठक, संजय राऊत,अनिल देसाई, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, विनायक राऊतांसह अनेक बडे नेते उपस्थित... महापालिका निवडणुका आणि संघटना बैठकीच्या अजेंड्यावर..
घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप, कालच्या राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची आज पुन्हा सोसायटीत धाव, मराठी कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप असलेल्याला विचारला जाब
पाणी प्रश्नासाठी अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेची महापालिकेत तोडफोड, मलकापूर परिसरात १० दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने संताप
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षक गिरीश फोंडेवरील कारवाईविरोधात कोल्हापुरात आंदोलन, राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी, संघर्ष समिती आणि शिक्षक संघटनांचं आंदोलन
महत्त्वाच्या बातम्या





















