ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 19 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 19 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत ११ जणांना अटक, ज्योती मल्होत्राप्रमाणेच पंजाब आणि हरियाणातील यूट्युबर्स आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सचा समावेश
हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानमधील शीख बोर्डावर नियुक्तीचं आश्वासन, तसंच यूट्यूबवरचे फॉलोअर्स वाढवण्याचं आमिष, ज्योतीनं आयएसआय एजंटसह चीनची सफर केल्याची माहिती
व्हिसासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं, अटक करण्यात आलेला हेर तारीफची चौकशीत कबुली.. भारतीय हवाई दल तळाच्या फोटोची मागणी केल्याचाही जबाब..
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर होतं पाकिस्तानच्या निशाण्यावर, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकचा डाव धुळीस, भारतीय लष्कराकडून पुरावे सादर
युद्धविरामाच्या स्थितीत जल्लोष नको, अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, कुणी काहीही बोललं तरी तिरंगा यात्रा निघणारच, भाजपकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर
ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच का कळवलं? राहुल गांधींचा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना सवाल, कारवाईपूर्वी नव्हे तर ऑपरेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात सूचना दिली, परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर























