TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 June 2024 : ABP Majha
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 June 2024 : ABP Majha
संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज पंतप्रधान लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेणार. त्यानंतर मंत्रिमंडळ आणि नव्या खासदारांना हंगामी अध्यक्ष शपथ देणार
आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन, NEET परीक्षेतला घोटाळा, लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता.
लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष निवडीवरुन सरकार आणि विरोधक आमने सामने, सर्वमान्य संकेत डावलून माहताब यांना निवडल्याचा विरोधकांचा आरोप.
राज ठाकरेंनी बोलावली आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार.
मुंबई आणि नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. निरंजन डावखरे, अनिल परबांसह अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला.
पुण्यातील हॉटेलमध्ये राजरोस ड्रग्स विक्री, फर्ग्यसून रोडवरील हॉटेलचा व्हिडीओ व्हायरल, पाच जण पोलिसांच्या ताब्यात, हॉटेल सील
पुणे ड्रग्जप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन, कामात हलगर्जीपणा केल्याने पोलीस आयुक्तांकडून कारवाई
नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या १ हजार ५६३ उमेदवारांपैकी फक्त ८१३ जणांनी दिली परीक्षा, ७५० उमेदवार गैरहजर.
पुणे ड्रग्जप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन, कामात हलगर्जीपणा केल्याने पोलीस आयुक्तांकडून कारवाई