ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 02 August 2024 : Maharashtra News
अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी...क्रिमीलेयरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय...
मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडेही तुच्छतेनंच पाहिलं जातं, राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
मनोज जरांगे आज पुणे न्यायालयात हजर राहणार, २०१३ मध्ये नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल.
पूजा खेडकरला कोर्टाचा मोठा दणका, दिल्ली कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला, पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला, संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर गाडीवर हल्ला, हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
खासदार नरशे म्हस्के यांच्यासह ठाण्यातील २२ लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस...नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे राजन विचारे हायकोर्टात...
प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये ५० टक्के ओबीसी उमेदवार असावेत, अन्यथा ओबीसी कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन.