ABP Majha Headlines : 10 AM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आज नरेंद्र मोदींचा शपथविधी, संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ
पंतप्रधान मोदींसह ५२ ते ५५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता, तेलगू देसमला एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रीपदं, जेडीयूला एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद, तर शिवसेना, राष्ट्रवादीला एक एक मंत्रिपदाची शक्यता
भाजपचे 7, जेडीयूचे 2 खासदारांना मंत्रीपदासाठी आमंत्रण, चिराग पासवान, एचडी कुमारस्वामी यांनांही मंत्रीपदासाठी कॉल...
राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल तर शिवसेनेकडून प्रतापराव जाधव मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, मात्र निरोपाच्या फोनची प्रतीक्षा
मंत्रिपद स्वीकारण्याचा खासदारांचा आग्रह श्रीकांत शिंदेंनी नाकारला...पक्षबांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार असल्याचं केलं स्पष्ट
शपथविधीआधी महात्मा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला मोदींकडून अभिवादन तर वॉर मेमोरिअल येेथे शहिदांचं स्मरण
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस,सगेसोयरे कायद्याची सरकारकडून अंमलबजावणी होईपर्यत उपोषणवर ठाम




















