ABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स 8 AM 08 July 2024 Marathi News
मुंबईत मुसळधार, ठाणे ते सीएसएमटी लोकल वाहतूक पूर्ववत होण्यास सुरूवात... कसारा, कर्जतपासून ठाण्यापर्यंतची वाहतूक विलंबाने, ऑफिसला जाणाऱ्यांचे प्रचंड हाल
मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणी, अनेक घरात, दुकानांत, हॉटेलात शिरलं रस्त्यावरचं पाणी
पुणे मुंबई सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्विन आज रद्द, मुसळधार पावसाचा परिणाम,...
मुंबईतील पावसामुळे पालिकेच्या पहिल्या सत्रातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर...तर परिस्थिती पाहून पुढील सत्रातील शाळांसंदर्भात निर्णय घेणार
कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टीची घोषणा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली घोषणा
वरळी हिट अँड रन केसमधील आरोपी मिहीर शाह अजूनही फरार, आरोपीचे वडील राजेश शाह आणि कारचालकाला अटक, आज कोर्टात हजर करणार

















