ABP Majha Headlines : 08 PM: 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
उद्या महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार, अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशाच्या सीईटीच उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून निकाल पाहता येणार.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईकरेट जास्त, त्यामुळे महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेचेे आमदार संजय शिरसाटांचा दावा.
कोण संजय शिरसाट, महायुतीत प्रत्येकाने जबाबदारीने बोलावं, लहान मोठे कोण हे तराजूमध्ये बसून मोजमाप करता येत नाही, नारायण राणेंचा संजय शिरसाटांवर पलटवार.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या क्लीनचीटला आक्षेप घेतला नाही, शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा मोठा खुलासा.
निवडणूक हातातून जातेय, हे लक्षात आल्यावर मतदानाच्या आधी दोन दिवस सोलापुरात दंगल घडवण्याचा कट होता, सोलापूरच्या कृतज्ञता मेळाव्यात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप.
खासदार प्रणिती शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप खोटा, आमदार राम कदम यांचं वक्तव्य.
१ जूलैपासून हे राज्य लोकशाहीच्या मार्गानं चालवलं जाईल का याची शक्यता कमी, यंत्रणेचा वापर करुन सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी घेतील, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य.
विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार
नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, तर अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया.
लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मीयांनी महाविकास आघाडीची मत दिलं, उद्धव ठाकरेंची माहिती, महाराष्ट्राला लुटण्याचा
प्रयत्न करणाऱ्यांना कुणीही मत देणार नाही, ठाकरेंचा विरोधकांना टोला.