ABP Majha Headlines : सकाळी 8 AM च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News
ABP Majha Headlines : सकाळी 8 AM च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News
शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती
पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार
मनोज जरांगे १ सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन
लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार, आगामी विधानसा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे
सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी...येत्या पंधरा दिवसांत घोषणा, बच्चू कडूंची माहिती...संभाजीराजे छत्रपती, राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा
सेबी, स्टॉक एक्स्चेंजला हायकोर्टाचा दणका... सेबी, एनएसई, बीएसईला ठोठावला ८० लाखांचा दंड
डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आज कोलकात्यात अधीर रंजन चौधरींच्या नेतृत्त्वात आज निषेध मोर्चा तर भाजपचं आजपासून सात दिवस धरणं
आता मिसिंगची तक्रार न नोंदवल्यास पोलिसांवर कारवाई, हायकोर्टाचा थेट इशारा, मिसिंगची तक्रार न घेणं खपवून घेणार नाही, हायकोर्टानं सुनावलं