ABP Majha Headlines : 7 AM : 11 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 11 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार
दिल्लीत आज महाराष्ट्राचं जागावाटप ठरणार, भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी बैठक, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रफुल्ल पेटलही दिल्लीत जाणार
आचारसंहिता लागण्याआधी राज्य मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक, महालक्ष्मी रेसकोर्समधील थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधत शरद पवार गटाची याचिका
अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधील अबोला कायम, पुण्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर, मात्र अजितदादा आणि ताईंनी एकमेकांशी बोलणं टाळलं
ईडीची नोटीस आल्यावर जागा आणि भूमिका कुणी बदलली हे जनतेनं पाहिलं. आज त्यांना दिल्लीत जाऊन मुजरा घालावा लागतो.. रोहित पवारांची अजित पवारांवर घणाघाती टीका
आमदार रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत, वायकरांची प्रतिक्रिया
रवींद्र वायकर आणि माझ्यातील संभ्रम दूर झाला.. वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा