(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 4 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात जलपूजन केलेल्या शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे रविवारी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत धडकले. संभाजीराजे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातून बोटीने मोदींनी (PM Modi) जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj memorial) ठिकाणी जाणार होते. मात्र, पोलिसांनी याठिकाणी संभाजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने एकच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झाली. पोलीस महाराष्ट्र स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना गाडीत डांबून ठाण्यात नेत होते. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक होत हस्तक्षेप केला.
माझे कार्यकर्ते हे काही आरोपी नाहीत. त्यांना कुठेही न्यायचे नाही. त्यांना आताच्या आता गाडीतून खाली उतरवा, असे संभाजीराजे यांनी पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करत असलेल्या डीसीपी मुंडे यांना सांगितले. त्यानंतर डीसीपी मुंडे आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा झाली आणि स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले. यानंतर संभाजीराजे यांनी एक छोटेखानी भाषण करत आपली भूमिका मांडली. यानंतर पोलिसांनी संभाजीराजे यांच्यासह 50 जणांना अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन झालेल्या जागेपर्यंत जाण्यास परवानगी दिली.