ABP Majha Headlines : 6 PM : 26 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6 PM : 26 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार, उपचारांसाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंदी, संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी सेवाही तात्पुरती बंद, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाचा निर्णय
भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवा, भाजप आमदारांना वरिष्ठांच्या सूचना
संसदेत मी पतीला घेऊन जात नाही, खासदार मी आहे, मतंही माझ्याकडे पाहूनच द्या, सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना सणसणीत टोला
विकासकामे वेगाने मार्गी लागावीत या उद्देशाने वेगळी भूमिका, राज्यातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात अजित पवारांचं स्पष्टीकरण, विकासाची ब्लू प्रिंट आणणार असल्याचीही ग्वाही
पणन कायद्यातील दुरुस्तीविरोधात आज बाजार समित्यांमध्ये एका दिवसाचा लाक्षणिक बंद, पुणे आणि नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट.
दारूच्या नशेत स्वतःच्या घरात झाडल्या गोळ्या, सुदैवानं कुणीही जखमी नाही, मुंबईच्या गोरेगाव भागातली घटना