ABP Majha Headlines : 7 AM :22 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM :22 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, विशाल पाटील अर्ज मागे घेणार की उमेदवारी कायम ठेवणार याकडे लक्ष.
दक्षिण मुंबईतून शिंदे गटाकडून मिलिंद नार्वेकर लढणार अशी चर्चा, परंतु बुलढाण्याच्या खामगावातील सभेत मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत.
नकली शिवसेनेच्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदी-शाहांवर निशाणा, असली शिवसेना की नकली शिवसेना हे निवडणुकीत दाखवून देतो, ठाकरेंचा इशारा.
बुलढाण्यातील सभेतून जे.पी. नड्डा यांची ठाकरे, पवारांवर टीका.. उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे परिवादवादी पार्टीचे, फक्त आपला परिवार वाचवण्यात गुंतलेत, नड्डा यांची घणाघाती टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची 24 एप्रिलला रत्नागिरीत होणारी सभा पुढे ढकलली,
लवकरच नवीन तारीख निश्चित होणार असल्याची माहिती.