ABP Majha Headlines 08 PM TOP Headlines 26 May 2025 संध्याकाळी 8 च्या हेडलाईन्स
मुंबईत मे महिन्यात बरसला १०७ वर्षांतला विक्रमी पाऊस...आतापर्यंत २९५ मिमी पावसाची नोंद...१९१८चा २७९ मिमीचा विक्रम मोडला..
मुंबईत मान्सून दाखल...भारतीय हवामान विभागाची अधिकृत घोषणा...ठिकठिकाणी सकाळपासून तुफान पावसाची हजेरी...पुण्यासह सोलापुरातही मान्सून दाखल
मुंबई मेट्रो- ३ ला पहिल्याच पावसाचा फटका...वरळी भुयारी मेट्रो स्थानकात शिरलं पाणी...वार्तांकनासाठी गेलेल्या माझाच्या प्रतिनिधींशी मेट्रो प्रशासनाची मुजोरी
नुकसानग्रस्त मेट्रो स्थानकाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी...काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटन केलंच कशाला, सरकारला सवाल...मुंबईची तुंबई झाल्यानं शिंदेंवरही निशाणा...
मुंबईत लोकलच्या चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्थानकादरम्यान शॉर्टसर्किटमुळे स्फोट, विद्युत वाहिनीवर झाड पडल्याने शॉर्टसर्किट
मुंबईत पावसाची तुफानी एण्ट्री...मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं... किंग्ज सर्कल, हिंदमाता, वाकोल्यात पाणी...तर पुढचे काही तास पावसाचा जोर राहणार
मुंबईतल्या कोस्टल रोड परिसरात मुसळधार पाऊस...तर पश्चिम दुतग्रती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी...वाहतूक संथगतीने सुरू...
पावसाचा जोर वाढल्यानं जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद...चौपाटीवर पोलिसांसह लाईफ गार्ड तैनात...पर्यटकांना चौपाटी परिसरात न येण्याच्या सूचना...
मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर...इशारा पातळी गाठल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर...नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
बारामतीत पाच दिवसात ३१४ मिमी पाऊस, पिंपळीत नीरा डावा कालवा फुटला, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरग्रस्त भागांची पाहणी,कांदा पिकाच्या नुकसानीचाही घेतला आढावा...मदत नको, अतिक्रमक काढा, नागरिकांचा रोष
सोलापूरच्या नीरा नरसिंगपूर भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचं आक्राळविक्राळ रूप...मुसळधार पावसामुळे संगम नगर भागात १२ ते १५ घरांत शिरलं नीरा नदीचं पाणी...आमदार उत्तम जाणकरांनी घेतला आढावा
सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग...कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो...तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळाचा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी...
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान...अनेक ठिकाणी कांदा पिकाला फटका...तर सिन्नर बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्याही भिजल्या...
स्थानिक स्वराज्य परिस्थितीनुसार युती अन्यथा स्वबळावर, भाजप खासदार अशोक चव्हाणांचं सूचक विधान...प्रत्येैक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार असल्याचंही वक्तव्य...
मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणात नवी अपडेट...अभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी...दिनो मोरियाचा भाऊ सॅन्टीनोचीही चौकशी...


















