(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 06 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लालबागचा राजाची उत्साहात मिरवणूक, मुंबईकरांची तुफान गर्दी, तर मुंबईचा राजा चौपाटीकडे मार्गस्थ
मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंगमधून पुष्पवृष्टीची ५५ वर्षांची परंपरा...यंदा एक हजार किलो फुलांची होणार उधळण...दीडशे ते दोनशे बाप्पांवर पुष्पवर्षाव...
गिरगाव चौपाटीवर मोठ्या बाप्पांचं विसर्जन सुरू, तर छोट्या मूर्तींनाही पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप...
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन, तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पालाही निरोप, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ, बाप्पासमोर पारंपरिक वेशात केरळी वादकांचं सादरीकरण...तर कलाकारांचंही वादन
नाशिकमध्ये रामकुंड परिसरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांची गर्दी, शहरांत मानाच्या गणपतींची २१ चित्ररथांसह मिरवणूक... हरयाणातील कलाकारांचं तांडव नृत्य
सोलापूर,नागपूर,कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुका सुरुवात, घरगुती बाप्पाचंही उत्साहात होत आहे विसर्जन...
ज्यांना सर्वात जास्त गरज त्यांना बाप्पांनी सुबुद्धी द्यावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गणरायकडे मागणी...सागरवरच्या गणपतीचं कृत्रिम हौदात विसर्जन...
महायुतीत समन्वयानं जागावाटप होतंय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास...अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची इच्छा असते...
युतीत शिंदे, अजितदादांना केवळ ४० ते ५० जागा मिळतील, संजय राऊतांचा दावा...स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढण्याचं दिलं आव्हान...
राष्ट्रवादीत कोणतीही नाराजी नाही, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण...शिंदेंच्या शिवसेनेला महामंडळांवर संधी मिळाल्यानं राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा...
अरविंद केजरीवालांनी दिला दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री...
सर्वोच्च न्यायालयाकडून बुलडोझर कारवाईला एक ऑक्टोबरपर्यंत स्थगिती...विशिष्ट धर्माच्या घरांची तोडफोड होत असल्याची जमियत उलेमा ए हिंदची याचिका...