(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 27 June 2024
विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र लिफ्टने प्रवास, राजकीय चर्चांना उधाण, तर ही योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे गंमतीनं म्हणाले, प्रवीण दरेकरांना बाहेर काढा, तर दरेकर म्हणाले दोघेच जाणार असाल तर जातो बाहेर...
गुण्यागोविंदाने राहणारे चार भाऊ काही कारणांमुळे वेगळे झाले असतील तर त्यांच्यातलं प्रेम कमी होत नाही, उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
विधान भवनात उद्धव ठाकरे- चंद्रकात पाटलांची भेट, अनिल परबांना पाटलांच्या अॅडव्हान्स शुभेच्छा, चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिलं चॉकलेट
विधानसभा निवडणुकीच्या आधी तात्काळ शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची मागणी
पीकविम्यावरून शेतकऱ्यांची थट्टा, छत्रपती संभाजीनगरात केवळ ७० ते ७५ रुपये भरपाई, उद्धव ठाकरेंचाही सरकारला जाब तर तात्काळ शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करण्याचीही मागणी