Aanadacha shidha : 100 रुपयात आनंदाचा शिधा योजनेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Mar 2023 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडव्याला दारिद्य्र रेषेखालील नागरिकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देऊन त्यांचा सण गोड करण्याचा प्लॅन सरकारनं आखला खरा मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपानं सरकारच्या या योजनेवर पुरतं पाणी फिरवलंय.. गुढीपाडवा दोन दिवसांवर आलाय... मात्र अजूनही सणापूर्वी हा आनंदाचा शिधा मिळेल याची शाश्वती कमीच आहे... अनेक ठिकाणी अजूनही हा शिधा पोहोचलेला नाहीये... काही ठिकाणी सामुग्री आलेली आहे... मात्र त्याचं वितरण करण्यासाठी कर्मचारी नाहीये... अगदी मोजक्या ठिकणी शिधा पोहोचलाय.. त्यामुळे सरकारनं योजना आखली खरी मात्र सणासुदीला आनंद देण्याच्या या योजनेवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपानं पाणी फिरवलंय.