Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

Continues below advertisement

बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावे लाटल्या, सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय, वडेट्टीवारांची सरकारवर टीका 
लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लाडकी बहिण योजनेवर (Ladki Bahin Yojana) शिंदे सरकारवर (Shinde Government) केली.    पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी दिक्षाभूमीला गेलो होतो. गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. ही दडपशाही आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्या आणि सोडा अशी विनंती केली होती, मात्र आता गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram