Aaditya Thackeray Majha Vision 2024 : मनसेसह युती करण्यात नातं आडयेतं? काकाबद्दल आदित्य म्हणतात..
Aaditya Thackeray: गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे गटाकडून गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला असा निरोप आला होता. पण जे गद्दार आहेत ते गद्दारच असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं. ते 50 खोके एकदम ओके असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता काकाचा दिल्लीपुढे वाका झाला आहे. अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यावेळेसची भाजप वेगळी होती. आताची भाजप वेगळी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन (majha maharashtra majha vision) या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले




















