राहुल गांधी पंतप्रधान म्हणून कसा कारभार करतील? आदित्य ठाकरे म्हणाले...
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन चर्चा उद्याच्या महाराष्ट्राची या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले.
Aaditya Thackeray : येत्या 4 जूनला केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बसणार, महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त जागा निवडून येणार असा विश्वास ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी व्यक्त केला. जो व्यक्ती चुकीचे निर्णय घेणार नाही, धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणार नाही अशी कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसण्याचा अधिकार असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान म्हणून कसा कारभार करतील? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, जर तर मध्ये मला जायचं नाही. यावेळी कोण पंतप्रधान नाही बनायला पाहिजे, यावर चर्चा करायला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले
भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडली
भाजपने (Bjp) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीत फूट पाडल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) केला. भाजपशी (Bjp) आमचं वैयक्तीक शत्रुत्व नाही. पण भाजपनं राज्यात घाणेरडं राजकारण केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही दोस्तीत धोका दिला नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, सध्या राज्यातील उद्योग गुजरातला जात असल्याचे ठाकरे म्हणाले.
आज मुळ भाजप गेली कुठं?
आज भाजपचे मुळ नेते कुठे जाणार? मूळ जी भाजप ती कुठे आहे? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. आज सगळी भाजप ही ड्रीम 11 झाली असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. शिवसेना फुटल्यानंतर काही काळानंतर राष्ट्रवादी देखील फुटली. त्यावेळी मला दु:ख झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शरद पवार यांच्या परिवारात फुट पडली याचे वाईट वाटल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पावसात उभा राहून शरद पवारांनी ज्यांच्यासाठी सभा घेतल्या त्यांनीच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपने आदर्श घोटाळा झाली की नाही हे सांगावं?
भाजपने आदर्श घोटाळा झाली की नाही हे सांगावं? 70000 कोटींचा जलसिंचन घोटाळा झाला की नाही? हे सांगावं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. आज तुमच्या हातात सत्ता त्यामुळं तुम्ही या सर्व प्रकरणांची चौकशी करावी असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?