Akola : विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षकाला आजन्म जन्मठेपेची शिक्षा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Mar 2022 09:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षकाला अकोला सत्र न्यायालयानं आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय... शुद्धोधन अंबोरे असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या प्रशिक्षकाचं नाव आहे.. ४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी ३० जुलै २०१८ रोजी अकोल्याच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.. राज्यस्तरावर कबड्डी संघात निवड करुन देण्याचं आमिष दाखवत दोषीनं सतरा वर्षीय विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलं आणि त्यातून ती गर्भवती राहिली होती. चार वर्षे खटला चालल्यानंतर न्यायालयानं दोषी शुद्धोधन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावतानाच ३ लाख दहा हजारांचा दंडही ठोठावला आहे..