Riteish Deshmukh : भाजपच्या आरोपांनंतर देश अॅग्रो कंपनीनं केला खुलासा, जाणून घ्या 6 मुद्दे
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला झुकतं माप देऊन भूखंड आणि कर्ज दिल्याचा आरोप भाजपनं केला. त्यानंतर देशमुख यांच्या कंपनीनं हे आरोप फेटाळले. लातूर एमआयडीसीमध्ये १६ उद्योजकांची प्रतीक्षा यादी असताना त्यांना डावलून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला अवघ्या 10 दिवसांत भूखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला. याशिवाय लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 116 कोटींच्या कर्जाचा पुरवठा अवघ्या काही दिवसात कसा केला असा सवालही भाजपनं केलाय. रितेश आणि जेनेलिया यांच्या देश अॅग्रो प्रा लिमिटेड या कंपनीसाठी यंत्रणा वेगाने कामाला लागली आणि भूखंड मंजुरीसह कर्ज प्रक्रिया गतीने पार पाडण्यात आली असा भाजपचा आरोप आहे. तर भाजप नेत्यांनी केलेले आरोप तथ्यहिन असून भूखंड आणि कर्ज नियमानुसारच दिल्याचं स्पष्टीकरण देश अॅग्रो कंपनीनं दिलंय. पाहुयात भाजप नेत्यांनी या कंपनीवर काय आरोप केले होते.