Wedding season : यंदा 38 लाख कर्तव्य ; लग्नसराईत पावणे पाच लाख कोटींचा व्यवसाय अपेक्षित !
Wedding season : यंदा 38 लाख कर्तव्य ; लग्नसराईत पावणे पाच लाख कोटींचा व्यवसाय अपेक्षित ! भारतात लग्नाचा सीझन सुरू झाल्यानं व्यावसायिकांना बंपर व्यवसायाची अपेक्षा आहे. २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान ३८ लाखांहून अधिक लग्न होण्याचा अंदाज आहे. व्यापाऱ्यांच्या संघटनेला सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने हा अंदाज वर्तवलाय. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर या लग्नाच्या मोसमामध्ये ३२ लाख लग्न झाली होती, तर याचदरम्यान अंदाजे पावणेचार लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. यावर्षी एकट्या दिल्लीतच ४ लाखांहून जास्त लग्न होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
महत्त्वाच्या बातम्या






















