Russia Ukraine Crisis: 'युक्रेनमधील शुल्क रचनेचा अभ्यास करणार'- मंत्री अमित देशमुखांची माहिती
स्वस्त वैद्यकीय शिक्षणामुळे युक्रेन आणि रशियाला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण मोठं आहे. ही बाब सध्याच्या युक्रेन-रशिया संघर्षात प्रकर्षानं पुढे आलेय. असाच स्वस्त वैद्यकीय शिक्षणाचा पॅटर्न राज्यात राबवता येईल का यासाठी युक्रेनियन पॅटर्नचा अभ्यास करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलंय. या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आलेय. तिचा अहवाल लवकरच अपेक्षित आहेत. प्रामुख्यानं युक्रेनमधील शुल्करचनेचा अभ्यास या समितीकडून केला जाणार आहे. भारतात होणाऱ्या खर्चाच्या अघ्या २५ टक्के खर्चात युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण पूर्ण होतं त्यामुळे हा पॅटर्न राज्यात राबवण्याबाबत आता विचारमंथन सुरू झालंय.























