Rajnath Singh Speech | पाकिस्तानला रात्रीचा दिवस दाखवला, भुज हवाईतळावर संरक्षणमंत्र्यांचं भाषण
Rajnath Singh Speech | पाकिस्तानला रात्रीचा दिवस दाखवला, भुज हवाईतळावर संरक्षणमंत्र्यांचं भाषण
Rajnath Singh on Operation Sindoor : भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. तसेच आपल्याला नाश्त्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेत तुम्ही दुश्मनांचा सूपडा साफ केलात, असे गौरवोद्गार काढत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या सैनिकांचं कौतुक केलंय. संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी (Rajnath Singh) आज (16 मे )भुज एअरबेसला भेट देऊन सैनिकांशी चर्चा केली. तसेच भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीबाबत शाबासकीही दिली. राजनाथसिंहांसह या भेटीवेळी एअरचीफ मार्शल अमरप्रीतसिंहही उपस्थित होते. ....ही काही छोटी गोष्ट नाही- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह "आपल्या हवाई दलाला पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रवेश कारणं शक्य आहे, हे आता पूर्णपणे सिद्ध झाले आहे. ही काही छोटी गोष्ट नाही. आज परिस्थिती अशी आहे की भारताची लढाऊ विमाने देशाच्या सीमा ओलांडल्याशिवाय ही येथून प्रत्येक कोपऱ्यात मारा करण्यास सक्षम आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'च्या नंतरच्या कारवाईत तुम्ही पाकिस्तानी भूमीवरील नऊ दहशतवादी अड्डे कसे उद्ध्वस्त केले आणि त्यांचे अनेक हवाई तळ कसे नेस्तनाबूत केले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
























