PM Modi on Virat: विराट घोड्याचा लष्कराकडून विशेष सन्मान, राष्ट्रपतींचा अंगरक्षक 'विराट' निवृत्त
राजपथावर आज ७३व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपताच राष्ट्रपती त्यांच्या भवनाकडे परतण्यासाठी निघाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील त्यांच्यासोबत होते. राष्ट्रपतींना भवनात घेऊन जाण्यासाठी अंगरक्षक येताच पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अंगरक्षकांच्या ताफ्यातील एका घोड्याला गोंजारलं. ही दृश्य सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आली. तर, या घोड्याचं नाव विराट असून तो १९ वर्षाच्या सेवेनंतर आज निवृत्त झालाय.. गेल्या १३ वर्षांपासून भारताच्या राष्ट्रपतींना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान विराटकडे होता..भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून विरटचा विशेष सन्मान केला आहे. विरटच्या गुणवत्तेसाठी आणि सेवांसाठी त्याला चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमंडेशन कार्डही देण्यात आलं आहे. दरम्यान आज प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या समारोपानंतर पीबीजीने विराटच्या निवृत्तीची घोषणा केली आहे.


















