एक्स्प्लोर
Padma Awards 2022 : 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील 10 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव
मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना गौरवण्यात आलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, सोनू निगम, विजयकुमार डोंगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. देशभरातून एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
आणखी पाहा























