एक्स्प्लोर
Odisha Train Accident : बालासोर अपघातस्थळी रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु
बालासोरमधील अपघातस्थळी आता एक मार्ग खुला झाला आहे.. यावरून आधी चाचणीसाठी आज पहाटे एक मालगाडी सोडण्यात आली. आणि मग सकाळी आठच्या सुमाराला पॅसेंजर ट्रेनही सोडण्यात आली. गेल्या ५० तासांपासून तब्बल एक हजार मजूर रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. दरम्यान, या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच केली आहे. यावर काय निर्णय होतो, ते येत्या एक ते दोन दिवसांत कळेल.
आणखी पाहा























