Farmers Protest | मोदी सरकारला कारवाईची जबाबदारी घ्यावी लागेल : प्रियांका गांधी
जवळपास महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या (Farmers Protest) शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीसाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ निघालेलं असतानाच त्यापूर्वीच पोलिसांच्या कारवाईमुळं तणावाची परिस्थिती निर्माण धाली. राष्ट्रपती भवनाच्या दिशेनं निघालेल्या काँग्रेस खासदार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी पक्ष मुख्यालयापाशीच रोखलं आणि सदर परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं.
काँग्रेस महासचिव (Priyanka Gandhi) प्रियंका गांधी यासुद्या कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पण, पोलिसांनी कारवाई करत त्यांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत देशातील सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. माध्यमांशी संवाद साधतेवेळी देशात रितसरपणे निवडून आलेल्या खासदारांना राष्ट्रपतींची भेट घेण्यापासून रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेचा त्यांनी कडाडून विरोध केला.
'आपण लोकशाही राष्ट्रात राहतो आणि ते (आंदोलनकर्ते) हे रितसरपणे निवडून आलेले खासदार आहेत. त्यांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ज्यासाठी त्यांना परवानगी मिळालीच पाहिजे. यासाठी हरकत का असावी? सध्याचं सरकार हे दिल्लीच्या सीमेवर असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचं म्हणणंच ऐकत नाहीय', असं त्या म्हणाल्या





















