Twitter India च्या दिल्लीतील ऑफिसवर दिल्ली पोलिसांकडून छापे, टूलकिट प्रकरणाशी संबंध असल्याच्या चर्चा
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
24 May 2021 10:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : टूलकिट प्रकरणावरुन देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून भाजप आणि काँग्रेस या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं दिसून येतंय. टूलकिट प्रकरणावरुन आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच भाजप नेते संबित पात्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.