एक्स्प्लोर
Bhagwant Mann: तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री मान यांचा मोठा निर्णय ABP Majha
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील आमदारांना आता फक्त एका टर्मसाठीच पेंशन दिली जाणार आहे. भगवंत मान यांनी एका व्हीडियोच्या माध्यमातून या नव्या निर्णयाची माहिती दिलीय. यापूर्वी आमदारांना निवडणूक जिंकल्यानंतर प्रत्येक टर्मसाठी पेन्शन मिळत असे. पाच-दहा टर्म जिंकलेल्या आमदारांना ३.५० लाखापासून ५.२५ लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळत असे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडत होता. पण आता हे सर्व बंद होणार आहे. याशिवाय मान यांनी माजी आमदारांचे अनेक भत्तेही कमी केलेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















