BJP Loksabha Election Candidate list : लोकसभेसाठी भाजपच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BJP Loksabha Election Candidate list : लोकसभेसाठी भाजपच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
लोकसभा उमेदवारीसाठी भाजपने आज पहिली यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत १९५ जणांना भाजपने उमेदवारी जाहीर केलीय. पंतप्रधान मोदी वाराणसीतून पुन्हा निवडणूक लढणार आहेत. तर अमित शाह पुन्हा गांधीनगरमधून निवडणूक लढणार आहेत. लखनऊमधून राजनाथसिंह तर अमेठीमधून स्मृती इराणी यांना उमेदवारी जाहीर झालीय. गुनातून ज्योतिरादित्य शिंदेंना उमेदवारी देण्यात आलीय. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना भाजपने लोकसभेचं तिकीट दिलंय. विदिशा मतदारसंघातून शिवराजसिंह चौहान हे निवडणूक लढणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातले एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते कृपाशंकर सिंह यांना भाजपने जौनपूरमधून तिकीट दिलंय. तर केरळमधून ए. के. अँटनी यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आलीय. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री निवडणूक लढत आहेत. तर दोन माजी मुख्यमंत्र्यांना भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. २८ महिला उमेदवारांचा या यादीत समावेश आहे.