Anant Ambani : जगभरातून रेस्क्यू केलेले प्राणी 'वनतारा'त ठेवणार;अनंत अंबानींशी Exclusive बातचीत
Anant Ambani : जगभरातून रेस्क्यू केलेले प्राणी 'वनतारा'त ठेवणार;अनंत अंबानींशी Exclusive बातचीत
अनंत अंबानींच्या संकल्पनेतून गुजरातच्या जामनगरमध्ये साकारलं जगातील सर्वात मोठं प्राणीसेवालय, रेस्क्यू केलेल्या प्राण्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि खाद्य पुरवणार गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठ प्राणीसंग्रहालय उभं राहतंय. इथं जगभरातून रेस्क्यू केलेल्या प्राण्यांना एकत्र ठेवून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि खाद्य पुरवलं जातंय. हत्तींसह जगाच्या कानाकोप-यातून वाघ-सिंह यांच्यासारखे हिंस्त्रप्राणीही एकत्र ठेवून त्यांचं संगोपन केलं जातंय. मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून 3 हजार एकर परिसरात हे संग्रहालय उभारण्यात आलंय. यासंदर्भात अनंत अंबानी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी.