Hingoli OBC Sabha : हिंगोलीत रामलीला मैदानावर ओबीसींचा 'एल्गार', कशी सुरुय तयारी?
Hingoli OBC Sabha : हिंगोलीत रामलीला मैदानावर ओबीसींचा 'एल्गार', कशी सुरुय तयारी?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी मात्र विरोध केला आहे. त्यामुळे राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचा निर्णय ओबीसी बांधवांनी घेतला आहे. याची सुरुवात जालन्यातील अंबडमधून झाली. तर, अंबडमधील पहिल्या सभेनंतर आता दुसरी सभा हिंगोलीत पार पडत आहे. आजच्या या सभेला छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे या सभेतून ओबीसी नेत्यांकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.























