Mumbai #Corona मुंबईत गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक वाढ, मागील 24 तासात 721 नवे कोरोनाचे रुग्ण
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शहरातील परिस्थिती सुधारत असताना कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 721 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत मृतांचा आकडा 11428 आहे.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या कोरोनाचे 5143 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. यातील 82 टक्के लोकांवर घरी उपचार केले जात आहेत. म्हणूनच सध्या रुग्णालयांवर सध्या कोणताही परिणाम दिसून येत नाही. कोरोनाचे जवळपास 18 टक्के रुग्ण उच्चभ्रू वस्तीत आढळले आहेत. सध्या शहराचा पॉझिटव्ह रेट 4.50 टक्के आहे.














