Marathwada Cabinet Meeting : 2016 ला केलेल्या घोषणा कागदावरच, मराठवाड्याला यंदा काय मिळणार?
Marathwada Cabinet Meeting : 2016 ला केलेल्या घोषणा कागदावरच, मराठवाड्याला यंदा काय मिळणार?
संभाजीनगरमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत सुमारे ४० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषि महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत सिंचन विभागाचा सर्वाधिक २१ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. काही प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा समावेश असल्याचंही समजतंय. या बैठकीच्या निमित्ताने प्रचंड कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर मंत्रिमंडळ बैठकच्या निमित्ताने १५ मोर्चे काढण्यात येतील. तसेच धरणे आणि निदर्शनेही केली जातील.























