Protest in Front of Raj Thackeray : चंद्रपुरात स्थानिकांची फसवणूक, राज ठाकरेंंसमोर पीडितांचं आंदोलन
रियल इन्फ्रा मध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कलकाम कंपनीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उतरलेल्या हॉटेल समोर पीडितांची निदर्शने, कलकाम कंपनीला चंद्रपूरच्या स्थानिक मनसे नेत्यांनी संरक्षण व समर्थन दिल्याचा आरोप, भरत गुप्ता (जिल्हाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना) आणि प्रतिमा ठाकूर (मनसे, चंद्रपूर शहर महिलाध्यक्ष) या संशयित नेत्यांनी पीडितांना मारहाण केल्याचा देखील आरोप, मुंबईपासून चंद्रपूर पर्यंत पसरलेल्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी दाद मागण्यासाठी पीडित पोहोचले राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या बाहेर, जोरदार नारेबाजी करून या कलकाम घोटाळा विरोधात मांडली कैफियत, राज ठाकरे यांना भेटूनच आपण इथून जाणार असल्याचा पीडितांचा निर्धार.























