Manohar Joshi Buldana People : शिवसैनिकांकडून मनोहर जोशींना भावपूर्ण श्रध्दांजली : ABP Majha
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं.हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना काल रात्री हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले, परंतु पहाटे त्याचं निधन झालं. गेल्या वर्षीही २२ मे रोजी त्यांना आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते सेमी कोमामध्ये होते. गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते.
दरम्यान मनोहर जोशी यांचे पार्थिव हिंदुजा रुग्णालयातून सकाळी नऊ वाजता माटुंगा इथल्या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर दुपारी २ नंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.























