Dada Bhuse Buldhana School : शिक्षणमंत्री भुसेंच्या येण्याआधी विद्यार्थ्यांना शाळेनं लावलं कामाला
एकेकडे राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची ही परिस्थिती तर दुसरीकडे आजपासून विदर्भातल्या शाळा सुरू होत आहेत आणि बुलढाण्याच्या सेनगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। मात्र दादा भुसे येण्याआधी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा झाडणं, कचरा उचलणं अशा कामाला जुंपलंय। एकीकडे विद्यार्थ्यांच्या स्वागताची भाषा तर दुसरीकडे त्याच विद्यार्थ्यांकडून शाळेची कामं करून घेतल्याचं दिसून आलंय। त्यामुळे दादा भुसे यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ते ज्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत येताना त्यांचं स्वागत करायचं, त्यांच्या हातामध्ये एक छान छोटसं फूल द्यायचं, त्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय करायचा, हे सोडून या चिमुकल्या विद्यार्थ्यांना हे पाण्याच्या बाटल्यांचे क्रेट उचलायला लागतायत। शाळा स्वच्छ करावी लागतेय, केर काढावा लागतोय। शिक्षणमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी या चिमुकल्यांचे हात पाय सध्या कष्ट घेताना आपल्याला दिसतायत आणि ही अत्यंत लाजेरवाणी आणि तेवढेच डोळे उघडणारी घटना एकीकडे सहर्ष स्वागताचे बॅनर लागलेले आहे. हे सहर्ष स्वागत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे की मंत्र्यांसाठी महत्त्वाचं आहे हे शाळा प्रशासनानं ठरवणं अत्यंत गरजेचं आहे। पहिल्या दिवशी नवलाईचं कौतुक करत ज्यावेळी हे सगळे विद्यार्थी नवीन दप्तर, नवीन बॅग, नवीन वॉटर बॅग, नवीन वह्या पुस्तकं घेऊन नवीन गणवेश घालून शाळेमधे येतात तेव्हा त्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय करायचा। पहिल्या दिवशी त्यांना छान छोटसं फूल देऊन त्यांचे स्वागत करायचं की त्यांच्या हातात ही केरसुणी देऊन केर काढायला लावायचा हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। डॉक्टर संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। संजय, पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या चांगलाच स्मरणात राहणार आहे कारण पहिल्याच दिवशी शाळा स्वच्छ करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांना। पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करू या तर शिक्षणमंत्री दादा भुसे आज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी इथं येणार आहेत आणि त्यामुळे या शाळेची स्वच्छता, साफसफाई, केर काढणं ही सगळी कामं विद्यार्थ्यांना सांगितली जात आहेत. एवढेच काय तर ऑलमोस्ट त्या विद्यार्थ्यांच्या वजनाच्या पाण्याच्या बाटल्यांचे क्रेट सुद्धा त्या विद्यार्थ्यांना उचलायला लावले जात आहेत। त्यामुळे अत्यंत संतापजनक आणि अत्यंत निराशावादी असं हे चित्र समोर आलेलं आहे की शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळा स्वच्छ करावी लागत आहेत. मग शाळेतले जे तृतीय कर्मचारी असतात ते कुठे गेले? त्यांनी शाळेची साफसफाई का केली नाही? शाळा सुरू व्हायच्या आधी या सगळ्याची खबरदारी का घेतली गेली नाही? हा सगळा प्रश्न उपस्थित होतोय। बरं शिक्षकांसमोर हे सगळे प्रकार घडत असतील तर या मागे नेमकं कोण कारणीभूत आहे? शिक्षकांची या सगळ्याला सहमती आहे का? हाही सवाल उपस्थित होता. संजय महाजन यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। संजय, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं हसतमुखानं स्वागत करायचं की त्यांच्या हातामध्ये झाडू देऊन त्यांना केर काढायला लावायचा? हा काय प्रकार घडलाय शाळेत? नक्कीच प्रज्ञा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर खरं तर आज शाळेचा पहिला दिवस आहे. विदर्भात शाळा आज सुरू होत्या आणि त्यासाठी विदर्भातील शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी राज्याचे सर्वोच्च शिक्षण क्षेत्रातले असाच शिक्षणमंत्री हे आज बुलढाण्यात येत आहेत। यांच्या स्वागतासाठी जी तयारी शिक्षकांनी केली खरं तर ती अपूर्ण होती। या ठिकाणी कुठलीही सोय त्यांनी केली नाही. मात्र विद्यार्थ्यांना सकाळी स्वागताऐवजी त्यांच्या हातात झाडू देण्यात आला। त्यांना विविध प्रकारच्या कामं सांगण्यात आली। पाण्याच्या बॉटल्स उचलून आत मध्ये नेण्यास सांगण्यात आल्या गाडीतनं आणि खरं तर पहिला दिवस आज विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असतो. मात्र या ठिकाणी अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडूनच शिक्षकांनी कामं करून घेतली आणि तेही शिक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमात। यामुळे खरं तर विद्यार्थ्यांना आता हा पहिला दिवस मोठ्या स्मरणात राहणार आहे। ज्यांचं स्वागत करणार त्यांच्याकडूनच विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांकडून कामं करुन घेत आहेत शिक्षक। अशा प्रकारचा हा याठिकाणी खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे। खळबळजनक






















