एक्स्प्लोर
Bhandara Monkey : वानरही करू लागलं हॉटेलिंग, भंडाऱ्यात वावरसाहेबांच्या हॉटेलिंगची पंचक्रोषित चर्चा
घरच्या जेवणाचा कंटाळा आला की आपली पावलं आपोआप हॉटेलकडे वळतात. मात्र आता वानरही हॉटेलींग करायला लागलंय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण भंडाऱ्यातल्या मोठा बाजार परिसरात बबन पंचभाई या व्यावसायिकाचं सुरेश नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक वानर दर मंगळवारी आणि शनिवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान नाश्ता करण्यासाठी येतं. . वानर येणार म्हटल्यावर त्याच्यासाठी टेबलही रिझर्व्ह करून ठेवण्यात येतं. हॉटेल मालकही मोठ्या उत्साहानं वानरासाठी त्याचा आवडता खाऊ काढून ठेवतो. जिलबी, समोसा, शेव, पापडी, पेढा आणि भिजविलेले चणे असं भरपेट जेवण जेवल्यावरच हे वानरराव हॉटेलमधून प्रस्थान ठेवतात.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement













