Namdev Shastri On Dhananjay Munde : मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडली, नामदेव शास्त्रींकडून पुन्हा एकदा पाठराखण
Namdev Shastri On Dhananjay Munde : मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडली, नामदेव शास्त्रींकडून पुन्हा एकदा पाठराखण
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडली असं नामदेव शास्त्री म्हणाले. तसंच सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा असं आवाहन देखील शास्त्रींनी उपस्थितांना केलं. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण मुंडेंच्या हातात हातून घडावं असं देखील शास्त्रींनी म्हटलं आहे.
ही बातमी पण वाचा
महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट (Cinema) पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. त्यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेतून केली. या वर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर (Mahesh manjarekar) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ₹ 10 लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक यासह दिला जातो.
चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप ₹ 6 लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाच्या स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना मिळणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे ₹ 10 लाख व ₹ 6 लाखांचे स्वरूप आहे. तसेच, 1993 पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ₹ 10 लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल यांसह दिला जातो.
























