Beed मध्ये होणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम, Dhananjay Munde - Pankaja Munde राहणार उपस्थित
मागच्या अनेक दिवसांपासून मुहूर्तावर मुहूर्त ठरणाऱ्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अखेर बीडमध्ये उद्या होणार असून ज्याची तयारी सध्या परळी शहरांमध्ये सुरू आहे.. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे.. बीड जिल्ह्यातील हा कार्यक्रम परळी शहरांमध्ये होत आहे त्या निमित्ताने बीड शहरांमध्ये मोठमोठ्या कमाने लावण्यात आले आहेत यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्यात.. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील या कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे जोरदार स्वागत करण्याची तयारी केली आहे याच तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी..























