Corona Vaccine Black market : Aurangabad मध्ये सॉफ्टवेअर बंद असल्याचा गैरफायदा घेऊन लसींची पळवापळवी
औरंगाबादमध्ये सरकारी लसीकरण केंद्रावरील लशी पळवून कशा प्रकारे काळाबाजार केला जातो याचा पर्दाफाश एबीपी माझानं काल स्टिंग ऑपरेशनद्वारे केला. त्यानंतर लशींची पळवापळवी कशी आणि का होते याची माहितीही एबीपी माझाच्या हाती आली आहे. लशींच्या साठ्याची ऑनलाईन नोंदणी करणारं इविन सॉफ्टवेअर दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांकडून आरोग्य केंद्राला किती लशी दिल्या गेल्या आणि त्यातल्या किती वापरल्या गेल्या याचा रिपोर्ट तात्काळ मिळत नाही. सॉफ्टवेअर बंद असल्यानं एका रजिस्टरवर नोंदी घेतल्या जातात. आरोग्य सेवकांचं फावतं आणि ते लशींच्या व्हाईल्सची पळवापळवी करतात, अशी माहिती माझाला मिळाली आहे.























