CM Eknath Shinde यांचा Aurangabad दौरा कसा असेल ते पाहूयात : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिन्याभरातील सहावी दिल्लीवारी आटोपून पहाटे पाच वाजता औरंगाबादमध्ये दाखल झालेत. दिल्लीत मुख्यमंत्र्यांची भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती मिळतेय... यावेळी महिन्याभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदेंनी भाजपच्या श्रेष्ठींशी चर्चा केल्याचं समजतंय.. त्यामुळे आता सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या दिल्लीवारीनंतर तरी होणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. ९ तासांच्या धावत्या दौऱ्यांनंतर शिंदे पहाटे पाच वाजता औरंगाबादमध्ये पोहोचलेत... त्यामुळे या ९ तासांच्या भेटीत काय घडलं याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. या सहाव्या दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा औरंगाबाद दौरा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे...
























