LAVASA CITY | लवासा खरेदीसाठी 3 कंपन्यांची बोली, अनिरुद्ध देशपांडे लवासा विकत घेणार? पुणे
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प खरेदी करण्यासाठी तीन कंपन्यांनी बोली लावल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी एक कंपनी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांची आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी अमेरिकेतील एका कंपनीसोबत मिळून लवासासाठी बोली लावली आहे. सध्या लवासामध्ये कायमस्वरूपी राहणाऱ्या रहिवाशांच्या संघटनेकडून लवासा खरेदी करण्यासाठी कमिटी ऑफ क्रेडीटर्समधे आपल्याला पाठिंबा देण्यात आल्याचा दावा अनिरुद्ध देशपांडे यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लवासा प्रकल्प सुरू करण्यास अनुकूलता दाखवल्यास लवासात येत्या तीन वर्षांमध्ये दहा हजार रोजगारांची निर्मिती आपण करू असंही अनिरुद्ध देशपांडे यांनी म्हटलंय.




















