मुंबई : ... तर विमानतळ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ रायगड उभारु : उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई विमानतळावर शिवाजी महाराज नुसतेच असे पाहायला बरे वाटत नाहीत. त्यामुळे येथे सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटीला सांगू इच्छितो कि, येथे छत्रपतींना छत्र मिळत नसेल, तुम्हाला ते देता येत नसेल तर आम्हाला तसा सांगा. कारण नुसतेच महाराज उन्हातान्हात येथे पाहवत नाहीत. आम्ही शिवसेनेच्या वतीने असाच रायगड वाटल्यास येथे उभारू, असा संकल्प उद्धव ठाकरेंनी सोडला आहे. शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.