Top 25 News : टॉप 25 न्यूज : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 4.30 PM : 16 July 2024 : ABP Majha
प्रकाश आंबेडकर राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा. एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काच्या लढाईसाठी असणार यात्रा. 'जय फुले जय शाहू जय भीम' टॅग लाईन. पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांची माहिती.
25 जुलैला दादर चैत्यभूमी येथून संविधान बचाव यात्रेला सुरुवात होणार असून, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्यात जाणार यात्रा. सात किंवा आठ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार यात्रेची सांगता.
खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून विशाळवरील मशिदीची पाहणी आमदार सतेज पाटील यांचीही उपस्थिती.
पोलिसांनी आडवल्याने सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती आक्रमक, १५ लोकांसह गडावर जाऊ द्या अशी सतेज पाटलांची विनंती केल्यानंतर पोलिसांकडून गडावर जाण्यास परवानगी.
विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा मोर्चा, जलील यांचं फेसबूकवरुन कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन.
काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली, कोल्हापूर विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करुन कारवाईची अस्लम शेख यांनी केली मागणी.
खासदार शाहू महाराजांना विशाळगड़ावर जाण्यापासून अडवणं ही दुर्दैवाची बाब. ज्यांना अडवायला पाहिजे त्यांना अडवलं नाही, त्यांनी पुढे जाऊन जी करायची ती तोडफोड केली. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया.
विशाळगडावर जाणून-बुजून लोकांना मारहाण आणि दुकान तोडण्यात आली, सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी.