Pandharpur Ashadhi Ekadashi : विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी, लाखो भाविक पंढरपुरात
आणि आता जावूयात पंढरपुरात. उद्या आषाढी एकादशी.. त्यानिमित्ताने पंढरपुरात भक्तांचा महापूर आल्याचं चित्र दिसतंय. मानाच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचतायत..विठुराच्या पंढरीत आल्यानंतर प्रत्येक भाविक चंद्रभागेत स्नान करतात आणि नामदेव पायरीचं दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात.. विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्यात.
Varkari Pesion Scheme : मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, कोणाला मिळणार लाभ? काय असतील तरतूदी?
Pandharpur Varkari Pesion Scheme : मुंबई : विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो पावलं पंढरीच्या (Pandharpur News) दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता फक्त आणि फक्त आपल्या माऊलीच्या भेटीच्या ओढीनं ही पावलं मैलोन् मैलचं अंतर पार करत पंढरीकडे चालत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या (Mukhyamantri Varkari Sampradaya Mahamandal) वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, महामंडळाचं भाग भांडवल 50 कोटी इतक असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे.