Aaditya Thackeray : आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही तर चूल पेटवणारं : आदित्य ठाकरे

Continues below advertisement

विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठाकरेंची शिवसेना तयारीला लागलीये. आजपासून आदित्य ठाकरेंचा शिवसंपर्क अभियान दौरा सुरु झालाय. कर्जतपासून सुरु झालेल्या या दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केलीये. काल शंकराचार्यांचं दर्शन घेतलं आणि आज जनतेचं दर्शन घेतोय हीच आपली वारी असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निषाणा साधलाय.

 ते कर्जतमध्ये बोलत होते. महाराष्ट्राचे यांनी हाल केले आहेत,  परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. कर्जतमध्ये 50 हजारचा लीड घेऊन जिंकायचं आहे, असंही आदित्य ठाकरे या वेळी बोलताना म्हणाले आहेत. 

जेव्हा गद्दारी झाली तेव्हा कोण आपल्या सोबत आहे हे कळत नव्हतं

आदित्य ठाकरे म्हणाले, कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही लढलात तुम्ही जिंकलेले आहात. सगळ्यांचे आभार मानायला मी येथे आलोय. उद्धव ठाकरेंनी आज मला येथे पाठवले आहे.  जेव्हा गद्दारी झाली तेव्हा कोण आपल्या सोबत आहे हे कळत नव्हतं.  सुरतवरुन गुवाहाटीला मिंधे पळत होते, तेव्हा आपली येथे सभा झाली होती. शंकराचार्य यांचा दर्शन घेतलं आज जनतेचा दर्शन घेतोय हीच वारी आपली आहे. 

मोदी सरकार, भाजप सरकार म्हणणारे आता NDA सरकार म्हणत आहेत

शंकराचार्य काल म्हणाले सगळ्यात मोठा घात विश्वासघात झाला, विश्वासघात सगळ्यात मोठं पाप आहे. त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे. आता या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. एक टप्पा आपण पूर्ण केलाय. आपण एक लढाई जिंकली आहे. कारण मोदी सरकार, भाजप सरकार म्हणणारे आता NDA सरकार म्हणत आहेत. परिवर्तन घडलय आणि संविधान वा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram