एक्स्प्लोर
मुलं पळवण्याच्या अफवेतून महिन्याभरात घडलेल्या घटना
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. मुलं पळवण्याच्या संशयातून पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राईनपाडा गावात नागरिकांनी 5 जणांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना ग्रामपंचायतच्या खोलीत डांबण्यात आलं. तिथंही त्यांना बेदम मारहाण झाली. यावेळी संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडलेला दिसला. मारहाण झालेले एका कोपऱ्यात विव्हळत असतानाही त्यांच्यावर उपचार करायचे सोडून, जमावाकडून त्यांना मारहाण सुरुच राहिली. आणि त्यातचं या पाचही जणांचा जीव गेला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशा अफवांचं पेव फुटलंय. या अफवांमधूनच औरंगाबाद, जळगाव, नांदेड, सोलापूरमध्येही महिला आणि तरुणांना मारहाण झाली होती. अशा प्रकारच्या घटना घडत असताना पोलिस प्रशासन काय करतं आणि अशा अफवा पसरत असताना आपलं सायबर सेल काय झोपलेलं असतं का, असा सवाल आता विचारण्याची वेळ आलीय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















