एक्स्प्लोर

Sidharth Shukla Death : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन; शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार

Sidharth Shukla Death : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. परंतु मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हृदय विकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खंर कारण कळू शकेल. मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला असं बोललं जात असतं ती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
Embed widget